You are currently viewing गीत..

गीत..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची काव्यरचना*

*गीत*

जय शंकर, हर हर महादेव

पार्वती पती गौरीहार,मती

बं बं भोलेनाथ,मम ह्दयदेवा

बलहारी,तारणहारी कैलाशपती

 

त्रिशूलधारी,त्रिनयन डमरुधारी

नागहार गळा, शोभे चारी धाम

निळकंळ माझा विष प्राशला तू

जगतगुरु ,नाशी क्रोध ताप काम

 

कार्तिक,गणेश पुत्र तुझे सुंदर

वेद पुराण चारी धाम तुज शरण

शिरी चंद्र शोभे कपाळी ते भस्म

हर हर गंगा भगीरथ धरी ते चरण

 

सत्यम् शिवम् सुंदरमं, मंत्र ते मुखी

शिवलिंग पुजीता लाभे स्वर्गसुख

गिरिपर्वती वसती तुझी गिरीधरा रे

करी जगताचे सारे हर हरी रे दुःख

 

हे शिवशंकर गिरिजात्मका देवा

सकल जनांचा त्राता दाता पिता

पुजीता शिवलिंग ,बेलपत्री शिरी

तुज असे रे जगी करता करवीता

 

© मुबारक उमराणी

सांगली

९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा