You are currently viewing शांतादुर्गा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

शांतादुर्गा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

मालवण

मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान कविता सादर केल्या तसेच विज्ञानावर आधारित भाषणे केली. तर यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध विज्ञान प्रतिकृतीनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाची सुरुवात ‘डोळे उघडून बघा गड्यानो झापड लावू नका’ या विज्ञान गीताने झाली. ‘प्रश्न किती गहन असो, उत्तर देते विज्ञान’ या कवितेने वातावरण विज्ञानमय झाले. यावेळी विज्ञान विषयावर अवधूत आचरेकर, राजकुमार दुखंडे, संघमित्रा पवार, रिया पेंडूरकर व सोहम चिरमुले या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यानिमित्त प्रशालेतून इ.८ वी,९ वी व १० वी तील विद्यार्थ्यांनी एकूण ३० विज्ञान प्रतिकृती तयार केल्या. यामध्ये कंपनावर चालणारा कोळी, राखेपासून वीज निर्मिती, साधे सायफन यंत्र, एअर कूलर, वॉटर हिटर, पाण्याचे शुध्दीकरण, सिगारेटचे दुष्परिणाम, फुप्फुस कार्य या सर्व प्रतिकृतींनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व विज्ञान प्रतिकृतीसाठी मार्गदर्शन प्रशालेचे विज्ञान शिक्षक प्रसाद कुबल यांनी केले. या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक जे. एन. पाटील, सौ. प्रीती सनये, सौ. वेदिका दळवी, प्रतिभा केळुसकर आदी व इतर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा