You are currently viewing जे जे न देखे रवी

जे जे न देखे रवी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम रचना

आकाश मार्ग हा एकच जरी दोघांचा
परि भेट न कधीही खेळच हा दैवाचा

मी जाणुन मनि जे पाहू शके ना रवी
जगी केवळ पाही सहजपणाने कवी

वाटले पहावे काय मनी दोघांच्या
बोलाया गेलो जवळच प्रतिबिंबाच्या

पाण्यात थरथरे प्रतिमा रवि बिंबाची
तें तेज नुरे कां किमया जल थेंबांची

बोलला रवी कीं तेज शाप मज भासे
तो चंद्र पहा ना चांदण्यां सवे जो हांसे

मी व्योमराज जरी मला न कोणी राणी
झुरतो मग पाहुन त्या चंद्रा सह रोहिणी

प्रेमी जीवांना ही साक्ष चंद्रमा शोभे
कां शीतलतेचे भाग्य तयासच लाभे

बोलला अखेरिस रवी हृदयीचा भाव
गीतात राहूदे मम सौंदर्यास प्रभाव

मी वादलो न करी खन्त बरा एकांत
चंद्रा तरी कोठे उषा रजनीची साथ

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा