*जुगाराची मैफील मात्र सजली सीमेवरील बांदा येथे*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुगाराला पेव फुटले आहे म्हणण्यास हरकत नाही. कधी दशावतारी नाटकाच्या आडून तर कधी गावागावात सुरू असणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या आडू न जुगाराचे पट बसवले जात आहेत.
गोवा राज्यातील पत्रादेवी येथे दशावतारी नाटक सुरू असून
गोवा राज्यात निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे तिथे जुगाराला बंदी असून दशावतारी नाटकाच्या आडून बसणाऱ्या जुगाराच्या मैफिली गोवा सीमेवरील बांदा येथे सजतात. गोवा राज्यातील अनेक जुगारी बांदा येथे सजलेल्या जुगाराच्या मैफिलीत सामील झाले असल्याची खात्रीशीर बातमी आहे. गोवा येथे सुरू असलेल्या आचारसंहितेमुळे गोव्यात सर्रासपणे बसणारे जुगाराचे पट गोव्याच्या सीमेवरील बांदा येथे बसतात. खाकी वर्दीच्या बीट अंमलदारांना मॅनेज करून दिवसा रात्री कधीही जुगाराचे पट बसवले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वसामान्य लोकांकडून छोट्या-मोठ्या चुकीसाठी वसुली करणारी खाकीवर्दी आपले खिसे भरत असल्याने जुगारासारख्या अवैध धंद्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुण युवक अवैद्य धंद्यांमध्ये गुरफटले जातात आणि तरुणाई देशोधडीला लागते. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या जुगारासारखे अवैद्य धंदे यांकडे डोळेझाक न करता योग्य ती कारवाई करणे जिल्हावासियांना अपेक्षित आहे.