बांदा
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेत विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाच्या विविध प्रयोगाची मांडणी केल्याने शाळेच्या परिसरात विज्ञान जत्रेचे स्वरूप आले होते.
दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो हा दिवस बांदा केंद्र शाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या दिवशी बांदा पानवळ शाळेचे सेवानिवृत्त होत असलेले शिक्षक श्री प्रदीप सावंत सर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रदीप सावंत सर यांचा बांदा केंद्र शाळेच्या वतीने सेवानिवृत्तीवर सत्कार करण्यात आला.
या दिवशी विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ असे विविध साहित्य तयार करून त्यांचे सादरीकरण केले होते. सौर ऊर्जेचा वापर, पाण्याची बचत आदर्श खेडे गाव, ज्वालामुखीचा उद्रेक ,हवेचे प्रयोग, पाण्याची घनता,सिंचन शेती अशा विविध विषयावर ३०हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रयोगाचे सादरीकरण केले. यावेळी सोळा विद्यार्थ्यांनी रांगोळीतून विविध प्रकारचे प्रयोग व वैज्ञानिक प्रतिकृती ची चित्रे साकारली होती तसेच विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासुन टिकाऊ बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन साहित्याची मांडणी केली होती. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या या सर्व साहित्यामुळे शाळेच्या परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात मांडलेल्या साहित्याचे पाहणी करून प्रयोग समजावून घेतले . कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, शिक्षका सरोज नाईक, पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये ,लुईजा गोन्सलवीस, जे. डी. पाटील ,रंगनाथ परब ,शुभेच्छा सावंत ,वंदना शितोळे ,जागृती धुरी, शितल गवस, रमेश पवार आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.