You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख

रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजाना कोणी विचारले नसते असे विधान करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे हा अपमान महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नाही. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ताबडतोब माफी मागावी अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते उठसूट छोट्या छोट्या गोष्टीसाठी आंदोलन करतात जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करतात. परंतू छत्रपती शिवाजीमहाराज यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी अपमान करून सुद्धा जिल्ह्यातील भाजपाई नेते व कार्यकर्ते मुग गिळून गप्प का? असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख यांनी विचारला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा