You are currently viewing गिर्यारोहण एक साहसी खेळ- उमेश झिरपे

गिर्यारोहण एक साहसी खेळ- उमेश झिरपे

वैभववाडी

आधुनिक काळात गिर्यारोहण या साहसी खेळाला महत्त्व प्राप्त झाले आहे. गिर्यारोहण हा छंद नसून साहसी क्रीडाप्रकार आहे. या साहसी खेळाबाबत अनेक गैरसमज आहेत.
या खेळाबाबत शास्त्रशुद्ध माहिती आणि प्रशिक्षण घेऊन करियर देखील करता येते असे प्रतिपादन श्री. शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त गिर्यारोहक कथा अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष श्री.उमेश झिरपे यांनी केले.


वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्यावतीने आणि महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि वैभव निसर्ग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गिर्यारोहण या विषयावर श्री.उमेश झिरपे यांचे व्याख्यान प्र.प्राचार्य डॉ.बी.डी.इगवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.


यावेळी व्यासपीठावर श्री. शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रस्तरारोहक व गिर्यारोहक आशिष माने, सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण,प्र.प्राचार्य डॉ.बी.डी. इंगवले, इतिहास विभाग प्रमुख तथा जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे सचिव प्रा. श्री. एस. एन. पाटील वैभव निसर्ग मंडळाचे प्रमुख प्रा.एन.आर.हेदुळकर उपस्थित होते.
यावेळी उमेश झिरपे यांनी गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकाराबद्दल सविस्तर माहिती देत असताना या क्रीडा प्रकाराकडे आपण छंद म्हणून न पाहता एक साहसी क्रीडाप्रकार म्हणून पहावे. या क्रीडा प्रकाराचा भारतातील इतिहास, सद्यःस्थिती आणि भविष्यातील खेळाची वाटचाल याबाबत माहिती दिली.


आपण स्वतः या खेळाकडे कसा वळलो आणि त्यापुढील एवरेस्ट चढाई पर्यंत प्रवास त्यांनी कथन केला.
या खेळाला समाज मान्यतेबरोबरच शासन मान्यता आणि करियरच्या दृष्टीने कसा उपयोग होऊ शकतो याबाबत माहिती दिली.
जिल्ह्यातील गिर्यारोहक, गिर्यारोहण संघटना यांची शिखर संस्था म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना काम पाहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गिर्यारोहण वाढीबरोबरच पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. उमेश झिरपे यांनी सांगितले.
यावेळी श्री.आशिष माने यांनी शालेय जीवनामध्ये केलेली डोंगर चढाई पुढील काळात गिर्यारोहणासाठी कशी उपयोगी ठरली याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ.कमलेश चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्यारोहण चळवळ याबाबत माहिती दिली.
गिर्यारोहण या खेळाविषयी जनसामान्यांना फारशी माहिती नाही. परंतु झिरपे सरांनी या खेळाबाबत सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांसह आमचे प्रबोधन केले आहे. संस्थेच्या उपक्रमाला महाविद्यालयाचे कायम सहकार्य राहील असे अध्यक्षीय भाषणात डॉ. बी.डी. इंगवले यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्यावतीने श्री.उमेश झिरपे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री.उमेश झिरपे यांनी महाविद्यालयाला गिर्यारोहण संबंधीत पुस्तकांचा संच भेट दिला.
मान्यवर पाहुण्यांची ओळख प्रा.एन.आर.हेदुळकर यांनी करून दिली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.व्ही.ए. पैठणे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा