You are currently viewing “काव्य माझ्या अंतरीचे”

“काव्य माझ्या अंतरीचे”

“काव्य माझ्या अंतरीचे”

काव्य माझ्या अंतरीचे,
अलीकडेच थोडं रुसलं.
मनाच्या हिंदोळ्यावर झोकावत,
झोक्यांच्या फेऱ्यात फसलं.

काव्य येतं हृदयातून,
मनाचा गाभारा फिरून.
हृदयातल्याच माणसांचं,
दुःख हृदयातूनच हेरून.

हृदयाच्या भावूक खेळात ,
काव्य अलगदच अडकलं.
शब्दांच्या मोहपाशात एकदा,
श्वासाविना तडफडलं.

शब्दही रुसले काव्यावर,
म्हणाले, का कोंडले मला?
आठवही काढत नाहीस,
हे शोभतं का तुला?

मुके झाले काव्य जेव्हा,
हुंदका कंठी अडला.
नयनातून अश्रूचा तेव्हा,
थेंबही गाली पडला.

काव्याचं दुःख शब्दांच्या,
अंतरी खोलवर रुतलं.
तिथेच पुन्हा शब्द काव्य,
एकमेकांच्या,,,
प्रेमामध्ये गुंतलं…..!!

(दीपी)
८४४६७४३१९६
दीपक पटेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा