You are currently viewing भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुका वतीने जागतिक मराठी राज्यभाषा दिन सोहळा साजरा

भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुका वतीने जागतिक मराठी राज्यभाषा दिन सोहळा साजरा

जिल्ह्यातील प्रख्यात लेखिका,साहित्यिक सौ.वृंदाताई कांबळी यांच्या हस्ते गुरूवर्य वि.स.खांडेकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साहित्यिक सौ.वृंदा कांबळी यांचा सत्कार

जागतिक मराठी राज्यभाषा दिन चे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने गुरूवर्य अ.वि.बावडेकर विदयालय शिरोडा येथे मराठी राज्यभाषा दिन सोहळा साजरा करण्यात आला.


जिल्हयातील प्रख्यात लेखिका व कांदबरीकार साहित्यिक सौ.वृंदाताई कांबळी यांच्या हस्ते गुरूवर्य वि.स.खांडेकर यांच्या पुतळयाला हार अर्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले . त्यानंतर समारंभ स्थळी प्रमुख पाहुण्याचे आगमन झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन या शाळेचे श्री एस्.एल्.कदम सर यांनी केले . मराठी गीत सादर करुन व गुरूवर्य वि.स.खांडेकर यांच्या प्रतिमेला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.पी.एस्.कौलापूर यांच्या हस्ते पुष्पहार व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी सर्वांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख करुन दिली.त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक अजीत राऊळ यांनी आपले विचार मांडले . त्यानंतर पी.के.कुबल यांनी मराठी दिनानिमित्त स्वरचित कविता सादर केली . त्यानंतर “आनंदयात्री” या ग्रुप मधील सौ.सुरेखा देशपांडे यांनी आपली “आई” हि कविता सादर केली . त्यानंतर स्वप्निल वेंगुर्लेकर,विशाल उगवेकर यांनी आपल्या कविता सादर केल्या . त्यानंतर शिरोडा शहर भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर गुरुजी यांनी आपल्या मनोगतामध्ये प्राथमिक शाळेमध्ये मराठी मध्ये शिक्षण किती गरजेचे आहे व त्याच आपल्या घरामध्ये सुध्दा मराठी भाषेचे वापराचे सातत्य ठेवणे व दशावतारी लोककलेचे महत्व या संदर्भात आपले विचार मांडले . त्यानंतर भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने जिल्हयातील प्रख्यात लेखिका व साहित्यिक सौ.वृंदाताई कांबळी यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष कौलापूरे सर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला . त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती सौ.वृंदा कांबळी यांनी आपल्या मनोगतामध्ये शिरोडा – वेंगुर्ला या मातीतच साहीत्य आहे , त्या साहीत्याची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली . त्यानंतर श्री.पी.एस कौलापूरे यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले या वेळी मान्यवर म्हणून भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळूस्कर,आरवली ग्रामपंचायत सरपंच तातोबा कुडव,शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ,शिरोडा ग्रामपंचायत सदस्य सौ.समृद्धी धानजी,उपतालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे मान्यवर म्हणून उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी यांनी केले .
या कार्यक्रमाला भाजप शिरोडा शहर उपाध्यक्ष संतोष अणसूरकर,सरचिटणीस सुरेश म्हाकले,भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, शिरोडा,आरवली,सागरतीर्थ,शक्ती केंद्र प्रमुख विदयाधर धानजी,महादेव नाईक,विजय बागकर,शिरोडा भाजप ज्येष्ठ पदाधिकारी अनिल गावडे,भाजप शिरोडा पदाधिकारी वासुदेव आरोस्कर,आरवली भाजप पदाधिकारी विश्वनाथ उर्फ भाई शेलटे,एकनाथ साळगांवकर,त्याच प्रमाणे आनंदयात्री ग्रुपचे आशिष वराडकर,जे.जे.पाटील सर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा