सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत झिरो ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना आज जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते बालकांना पोलिओचा डोस देवून पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पल्स पोलिओ लसीकरणावेळी लहान बालकांना घेऊन आलेल्या मातांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. या लसीकरणावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्पणा गावकर, जिल्हा बाल संगोपण अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी हर्षल जाधव, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. अविनाश नलावडे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.