You are currently viewing काँग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणीसाठी आ. प्रणिती शिंदे कोकणात येणार

काँग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणीसाठी आ. प्रणिती शिंदे कोकणात येणार

युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी घेतली सदिच्छा भेट

मालवण :

डिजिटल नोंदणी राज्य प्रभारी आमदार प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी कोकणातून जास्तीत जास्त सभासद नोंदणी होण्यासाठी आपण कोकणात येणार असल्याचे सांगतानाच उर्वरीत महाराष्ट्रा प्रमाणेच कोकण विभागातून जास्तीत जास्त नोंदणी करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात येणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितल्याची माहिती अरविंद मोंडकर यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाची डिजिटल सभासद नोंदणी चालू असून कोकण विभागात सुध्दा या नोंदणी वर भर देण्यासाठी समन्वयक नेमले आहेत. या नोंदणीसाठीचे मार्गदर्शन शिबिर मुंबई येथे झाले. यावेळी या डिजिटल नोंदणीच्या राज्य प्रभारी प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची विधानसभा २०१९ चे उमेदवार तथा जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान प्रणिती शिंदे यांनी उर्वरित महाराष्ट्र प्रमाणे कोकणातही जास्तीत जास्त नोंदणी झाली पाहिजे व त्यासाठी आम्ही देखील कोकणात येऊ असे सांगितले. पीआरओ तथा माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या उपस्थितीत कोकण विभागातून जास्तीत जास्त नोंदणी करणाऱ्या नोंदणीकर्ता कार्यकर्ता – पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात समीर वंजारी यांच्या मुख्य समन्वयातून नोंदणी चालू असून जिल्ह्यातील विधानसभा उमेदवारांनी आपल्या मतदार संघात येत असलेल्या तालुक्यातील बूथ वरील नोंदणी संदर्भातील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या बुथवरून तालुक्यातील नोंदणी पूर्ण केली जाईल त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितल्याचे श्री. मोंडकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा