You are currently viewing यशस्वी जीवन

यशस्वी जीवन

 

*जगात हजारो माणसे जन्माला येतात व काही काळ जगून हे जग सोडतात.अशा रीतीने जन्म-मरणाचे चक्र अव्याहतपणे अनंत काळापासून चालू आहे व अनंत काळापर्यंत चालूच राहणार आहे.किती पशु-पक्षी जन्माला आले व किती मेले याची नोंद, गणती किंवा शिरगणती कोणीही ठेवीत नाही,त्याचप्रमाणे किती माणसे जन्माला आली व किती माणसे मेली याचा सुद्धा जग विशेष विचार करीत नाही.भा.रा.तांबे या कवीने म्हटल्याप्रमाणे,*

*”जन पळभर म्हणतील हाय हाय”*

*इतकेच म्हणून जणू काहीच घडले नाही अशा थाटात लोक आपल्या दैनंदिन कामाला लागतील.*

*”जगात जगतात सर्वच! पण जगतात कसे?”यालाच जीवनात खऱ्या अर्थाने महत्त्व आहे.या दृष्टीने यशस्वी जीवन जे जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात असे म्हणता येईल.पण येथे असा प्रश्न निर्माण होईल की “यशस्वी जीवन” कशाला म्हणावयाचे? कनक कांता, सत्ता,संपत्ती व कीर्ती या सर्वांची जरी प्राप्ती करून घेतली तरी सुद्धा याला ‘यशस्वी जीवन’ असे म्हणता येणार नाही.म्हणून स्वतः सुखी होऊन इतरांनाही सुखी करण्याचे ज्यांनी अविरत प्रयत्न केले तेच खऱ्या अर्थाने जगले व त्यांचेच जीवन यशस्वी जीवन असे म्हणता येईल.*

 

🙏सद्गुरु श्री. वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा