जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक, कवी, गीतकार,संगीतकार,गायक श्री अरुण गांगल यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहिलेली शब्दसुमनांजली
“स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुण्यतिथी निमित्त पुष्पांजली”
स्वातंत्र्यवीर कल्पनांचा महासागर
स्वराज्य सुराज्य संकल्पनांचा अविष्कार।।ध्रु।।
ठिणगी नव्हे नुसती,होते प्रज्वलित अग्नी
तादात्म्य होते एक रूप मन कर्म वचनी
व्यक्तित्व कृतित्व वक्तृत्व कवी कर्मवीर।।1।।
तप तत्व त्याग तेज तळपे सतत
क्रांतीच्या आवेगात होते चांदणे कवितेत
तितिक्षु जहाल हळवे होते सावरकर।।2।।
क्रांती भक्ती असाध्यत्व होते कुटुंबात
उद्वेग आवेग संवेग होते सम्मिलित
विरत्व,कवित्व चंद्राशी गुज अलवार।।3।।
भूवरी पाय रोवून उंच भरारी घेत
आकाशी विहरताना धरित क्रांती ज्योत
दुष्प्रवृत्ती विरुद्ध लढती सावरकर।।4।।
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.