राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले यांनी केला शुभारंभ
सावंतवाडी
येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात पारंपारिक दिना निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नियामक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, प्रा. डॉ. बी. एन. हिरामणी, कला सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. डी. जी. बोर्डे उपस्थित होते.
राणी साहेब श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोसले यांनी मुलांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. या उपक्रमा अंतर्गत रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, माती काम, ऑन द स्पॉट पेंटिंग आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान विजेची बचत, जल जमीन जंगल संवर्धन, या विषयावर सुबक रांगोळी काढल्या व सामाजिक प्रबोधन करत ज्वलंत विषयावर जागृतीचा संदेश दिला. यावेळी कला व सांस्कृतिक विभागातील सह समन्वयक डॉ. एस. एम. बुवा, सदस्य प्रा. एस. ए. देशमुख, प्रा.ए. स. जे. जाधव, प्रा. के. एस. तळेकर, प्रा. डॉ. वाय. पवार, प्रा. आर. के. शेवाळे, प्रा. एस. एस. तारी यांचे सहकार्य लाभले. परीक्षणाचे कार्य मदर क्वीन हायस्कूलचे श्री. खोपकर सर यांनी केले.
मेहंदी स्पर्धेत प्रथम मुस्कान जावेद खान (एफवाय बीकॉम ) द्वितीय निदा दिलावर बेग (टीवायबीएससी आयटी), तृतीय जान्हवी चिंतामणी प्रमुख खानोलकर (एस वाय बी कॉम), रांगोळी स्पर्धेत प्रथम विद्या विश्वनाथ पाटील ( एस वाय बी ए ), द्वितीय मृणाल मनोहर देसाई (एसवाय बीएस्सी), तृतीय मानसी सुनिल दत्त राऊळ (टीवायबीकॉम ), ऑन द स्पॉट पेंटिंग प्रथम तुकाराम लक्ष्मण करमळकर (एमएस्सी द्वितीय वर्ष ) द्वितीय क्षितिजा शंकर घाडी (एसवायबीए), तृतीय समिक्षा शेखर भानुशाली (एसवायबीए), मातीकाम स्पर्धा प्रथम मंदार दुर्गाराम जोशी (एमएस्सी द्वितीय वर्ष ) यांनी पटकावले यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते