You are currently viewing कोंकण कॉयर महोत्सवाचे शानदार उद्घाटन

कोंकण कॉयर महोत्सवाचे शानदार उद्घाटन

प्रगती करा व आर्थिक उन्नत्ती साधा ; ना. नारायण राणेंचे उद्योजकांना आवाहन

कुडाळ

कुडाळ शहरामध्ये आयोजित कोकण कॉयर महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय लघू सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दिमाखात झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कॉयरच्या सर्व स्टॉलना भेट देऊन माहिती जाणून घेतली. तसेच यामध्ये अजूनही प्रगती करा आणि आर्थिक उन्नती करा असे आवाहनही त्यांनी उद्योजकांना केले.

कुडाळ येथील एसटी बस स्थानकाच्या विस्तीर्ण मैदानावर कोकण कॉयर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले.


यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे, कॉयर बोर्डाचे अध्यक्ष कुप्पूरमू, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव बी. बी. स्वॅईन, खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, आनंद शिरवलकर, दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, शहर अध्यक्ष राकेश कांदे, कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक विलास कुडाळकर, प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, मोहन सावंत, राजा धुरी, माजी नगरसेविका साक्षी सावंत, महिला सरचिटणीस रेखा काणेकर, श्रीपाद तवटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना नृत्याने करण्यात आली. या प्रसंगी ना. राणे यांच्या हस्ते कॉलरचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी महिलांना प्रशस्तीपत्रकांचे वितरण करण्यात आले. गणेश वंदना येथील नृत्य कलाकारांना नामदार राणे यांनी सन्मानित केले. यावेळी कॉयर उद्योगातील व्यवसायिक, महिला व नव उद्योजक व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा