You are currently viewing आई भराडी

आई भराडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या कवयित्री सौ आदिती मसुरकर यांची आंगणेवाडीची देवी भराडी वर लिहिलेली काव्यांजली काव्यरचना*

 

*आई भराडी*

आई भराडी
मागे वळून पाहताना
एकटीच राहताना
आठवते

आले धावून
माते तुझ्या दर्शनासाठी
टेकीत काठी
गर्दीतुनी

डोळे भरून
रूप तुझे पाहते
पुष्पे वाहते
चरणांशी

कोकणची माता
भक्तांच्या हाकेला धावते
नवसाला पावते
देवी

अवघ्या विश्वात
पसरली तुझी किर्ती
सात्विक मूर्ती
भराडीची
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*✍️© सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा