You are currently viewing आमच्या विरोधात द्वेषाची भावना ठेवणाऱ्या राजकारण्यांना आई भराडी उत्तम आरोग्य दे! – केंद्रीयमंत्री नारायण राणे

आमच्या विरोधात द्वेषाची भावना ठेवणाऱ्या राजकारण्यांना आई भराडी उत्तम आरोग्य दे! – केंद्रीयमंत्री नारायण राणे

आमच्या विरोधात द्वेषाची भावना ठेवणाऱ्या राजकारण्यांना आई भराडी उत्तम आरोग्य दे! – केंद्रीयमंत्री नारायण राणे

मालवण

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, सौ निलमताई राणे यांनी आंगणेवाडी येथील भराडी मातेचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले,
मला विविध क्षेत्रात यश तसेच वेगवेगळी पदे मिळाले ती आई भराडीदेवीच्या आशीर्वादामुळेच. त्यामुळे न चुकता मी आंगणेवाडी यात्रेला येतो. केलेली विकास कामे मी कधी सांगत नाही.

गेली 33 वर्षे विविध पदावर देवीच्या आशीर्वादाने जनकल्याण करावं यासाठी मी प्रयत्नशील आहे. केंद्रात एमएसएमइ या खात्याचा मंत्री असून 80 टक्के उद्योग या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. चांगल्याला चांगलं म्हणावं. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. आज देवीला एकच प्रार्थना करणार आहे, देवी माझ्याशी राजकारणात दृष्ट बुद्धीने वागणारे, माझ्यावर विविध मार्गाने अडचणी निर्माण करून द्वेषाची भावना ठेवणाऱ्यां राजकारण्यांना उत्तम आरोग्य दे! आणि या लोकांना सामोरे जाण्याची ताकद राणे कुटुंबाला देवीने द्यावी असे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आंगणे कुटुंबियांचे स्वागत स्वीकारल्यानंतर सांगितले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार हल्ला करताना परखड विचार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मांडले.

शिवसेना पदासाठी सत्तेत आहे.शिवसेनेची केंद्रात सत्ता येणे लांबची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मगिळवेळी 18 खासदार निवडून आले होते. पुढच्या वेळी पाच खासदार सुद्धा असणार नाहीत. भाजपचे देशात 301 खासदार आहेत. संजय राऊत वेड्यासारखे बोलत आहे. देशद्रोही लोकांचे समर्थन करत आहे. त्यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या पापाबद्दल बोलावे. हिंदुत्वाचा त्याग करून सत्तेत बसलेल्यांनी आम्हाला सत्तेत येऊ असे सांगू नये. खरंतर देशद्रोही माणूस आज मंत्रीपदावर आहे. नवाब मलिक यांना राष्ट्रवादी सहित सर्वजण समर्थन करत आहेत.

त्यामुळे कडवट हिंदुत्ववादी माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सुद्धा देश द्रोही लोकांचे समर्थन करण्यासाठी उपोषण करत आहे. या सर्वांना देशद्रोही कायद्याखाली अटक केली पाहिजे असेही सांगितले.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार श्याम सावंत, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी जी प अध्यक्ष अशोक सावंत, उधोजक रवी शेडगे, भास्कर आंगणे, बाळा आंगणे, आनंद आंगणे,मधुकर आंगणे, काका आंगणे, दीपक आंगणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा