You are currently viewing ‘किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत’ मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

‘किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत’ मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियनांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2021-22 साठी स्किल इंडिया पोर्टल व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांच्याकडे नोंद असलेल्या संस्थांमार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

            प्रशिक्षण व संस्थांची माहिती पुढीलप्रमाणे. संस्थेचे नाव, क्षेत्राचे नाव, कोर्सचे नाव व शैक्षणिक पात्रता अनुक्रमे दिली आहे. श्री साई इन्फोटेक, सावंतवाडी – मीडिया एंटरटेन्मेंट – अकौंट एक्झिकेटीव्ह – 10 वी पास, आय टी – डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर – 10 वी पास, टुरिझम व हॉस्पिटॅलिटी – स्ट्रीट फूड वेंडर – 5 वी पास.

            मेट्रोपॉलीन इंस्टिट्युट ऑफ ॲन्ड मॅनेजमेंट, सुकळवाड, ता. मालवण – इलेक्ट्रॉनिक्स – सोलर पॅनेल इंस्टॉलेशन टेक्निशीयन – 10 वी पास, मीडिया एंटरटेन्मेंट – ग्राफिक्स डिझायनर – 12 वी पास, आय-टी – असोसिएट डेस्कटॉप पब्लिशिंग (डीटीपी) – पदवी.

            श्री. साई इन्फोटेक, माणगाव, ता. कुडाळ – ॲपरल्स – असिसटंट फॅशन डिझायनर – 10 वी पास, मीडिया एंटरटेन्मेंट – अकौन्ट एक्झिकेटीव्ह -10 वी पास, आय -टी – ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर – 12 वी पास.

            आरआयपीएल @ सिंधुदुर्ग, कणकवली – आय-टी – ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर – 12 पास, मीडिया – मेक अप आर्टिस्ट – 10 वी पास.

            श्री साई इन्फोटेक, सांगुळवाडी, ता. वैभववाडी – ॲग्रिकल्चर – ॲग्री क्लिनीक ॲन्ड ॲग्री बिझनेस सेंटर मॅनेजर – पदवी ॲग्रीकल्चर, ॲग्रीकल्चर – गार्डनर कम नर्सरी रायजर – 5 वी पास, आय-टी – डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर – 10 वी पास.

            श्री. साई इन्फोटेक शिरोडा, ता. वेंगुर्ला – ॲपरल – सेल्फ एंप्लॉयड टेलर – 8 वी पास, इलेक्ट्रॉनिक्स – फिल्ड टेक्निशियन कंम्प्युटिंग ॲन्ड पेरिफेल्स 12 वी पास फक्त दिव्यांगांसाठी.

            अटी व शर्ती – उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षादरम्यान असावे. यापूर्वी राज्य किंवा केंद्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत कोणत्याही प्रशिक्षणाचा लाक्ष घेतलेला नसावा.

            तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षण संस्थांकडे संपर्क करून नाव नोंदणी करावी किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र सिंधुदुर्ग या कार्यलायशी दूरध्वनी क्र. 02362-228835 / 9403350689 येथे संपर्क करावा असे आवाहन शा.गि.पवार, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा