You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मसुरे, मर्डे, देऊळवाडा, डांगमोडे येथील विविध विकास कामांची भूमिपूजने

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मसुरे, मर्डे, देऊळवाडा, डांगमोडे येथील विविध विकास कामांची भूमिपूजने

मसुरे, मर्डे, देऊळवाडा, डांगमोडे येथिल अनेक विकास कामांची भूमिपूजने आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये मर्डे टोळकवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, मर्डे उसलाटवाडी टोळकवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ४ लाख २० हजार, मसुरे मर्डे खाजणवाडी कांदळगाव मुख्य रस्ता ते गावडे पुरुष मंदिर लगत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ४ लाख, डांगमोडे मुख्य रस्ता इस्वटी महापुरुष ते मधलीवाडी पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, देऊळवाडा येथील श्री. क्षेत्र भरतेश्वर मंदिर ते भरतगड हायस्कुल रस्ता, देऊळवाडा येथील श्री. वेताळ मंदिर ते पंढरीनाथ बागवे घरापर्यंत रस्ता, खेरवंद येथील स्मशानभूमी पर्यंत जाणारी पायवाट तयार करणे, देऊळवाडा येथील विकासवाडी येथे स्मशानशेड बांधणे हि कामे मंजूर करण्यात आली असून कामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.

यावेळी मसुरे मर्ढे येथे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उप तालुकाप्रमुख छोटू ठाकूर, विभागप्रमुख राजेश गावकर,सरपंच संदीप हडकर, पोईप विभागप्रमुख विजय पालव, ग्रा. प. सदस्य जगदीश चव्हाण, श्री. मुळीक श्री. पारकर, श्री.पाटकर,
डांगमोडे येथे पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर, ग्रा. प. सदस्य पूजा ठाकूर, पांडुरंग ठाकूर,व्यंकटेश ठाकूर, सोमा ठाकूर, देऊळवाडा येथे सरपंच आदिती मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र सावंत, अशोक मसुरकर, चंद्रकांत राणे, उदय बागवे, संतोष काळसेकर, राजू सावंत, अनिल सावंत , गणेश परब, अर्जुन घाडी, शिवा मेस्त्री, श्री. सावंत, श्री. पाडावे, बंडू बागवे, बाबू मुळये
खाजणवाडी येथे मुंबईच्या नगरसेविका सिंधुताई मसूरकर, सुहास गावकर, गणेश गावकर, तुकाराम गावकर, दत्तराज गावकर, विठोबा मसुरकर, सिद्धेश गावकर,संजय मसुरकर, कृष्णा गावकर, सुरेखा गावकर, शिवानी गावकर, समिधा गावकर, समीक्षा गावकर, जागृती गावकर, सुमिता गावकर, माधुरी गावकर, आशा गावकर, संतोष गावकर, शर्मिला गावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =