शिवसेना पक्ष गेली साडे सात वर्षे सत्तेत ;आंगणेवाडी यात्रा विकासासाठी निधी का आणू शकत नाही
आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्या आंगणेवाडी यात्रेबाबत नियोजनाचे श्रेय घेण्याचा आमदारांचा प्रयत्न -मनसे
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी सत्ताधार्यांच्या कुडाळ मध्ये घेतलेल्या आंगणेवाडी यात्रेच्या नियोजन बैठकीवरून केलेली टीका आमदार वैभव नाईक यांना झोंबल्यामुळेच यात्रेच्या आदल्या दिवशी आंगणेवाडीत येवून बैठक घ्यावी लागली.अशी टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.
वास्तविकपणे उत्सवाची सर्व तयारी आंगणेवाडी ग्रामस्थ, प्रशासन,व्यापारी यांनी केली व ती पूर्ण झाली असून आमदार आंगणेवाडीत येवून वराती मागून घोडे नाचविण्याचा प्रकार करत आहेत.आंगणेवाडी यात्रेबाबत कोणतीही आस्था या सत्ताधार्यांना नाही.त्यामुळे यात्रा नियोजन बैठकही त्यांनी आंगणेवाडीत घेतली नाही,आंगणेवाडी यात्रेपूर्वी नियोजन बैठक आंगणेवाडीत न घेणारा पहिलाच पालकमंत्री आहे. आंगणेवाडी ग्रामस्थ,प्रशासन,व्यापारी यांच्यासोबत आंगणेवाडीत अथवा मालवण तालुक्यात बैठक घेऊन जनमत जाणून घेणे गरजेचे असताना तसे न करता कुडाळ येथे स्वतःच्या सोयीने बैठक घेऊन हुकूमशाही पद्धतीने पालकमंत्री यांनी यात्रेवर निर्बंध लादले.अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली होती.
मुळात गेली अनेक वर्षे आंगणेवाडी कुटुंब ग्रामस्थ यांच्या चोख नियोजनामुळे यशस्वीपणे पार पाडत आलेली आहे भराडी देवीच्या दर्शना साठी येणारे मंत्री लोकप्रतिनिधी आंगणेवाडी मंदिर परिसरात स्टेजवरून विकास तीर्थ स्थानाप्रमाणे केला जाईल असे सांगतात कोट्यवधींचा निधी आम्ही आणणार असे सांगतात परंतु आंगणेवाडी मंदिर परिसराचा म्हणावा तसा विकास आजही झालेला नाही.
शिवसेना पक्ष गेली साडे सात वर्षे सत्तेत आहे.आमदार खासदार पालकमंत्री सेनेचा आहे.मग आंगणेवाडी यात्रा विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात खास बाब म्हणून निधी का मंजूर करत नाहीत ? व्यापारी,दर्शनाला येणार्या भाविकांना सोई सुविधा यात्रोत्सव कालावधीत का मिळू शकत नाहीत? कारण सत्तेतील शिवसेनेला आंगणेवाडी ग्रामस्थ व दर्शन घेणार्या भाविकांची आस्था नाही.फक्त दुसर्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेणारे आमदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या वैभव नाईकांनी आजही नियोजन सभेचे नाटक करत ग्रामस्थांच्या व लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले आहे अशी टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.