You are currently viewing आंगणेवाडी जत्रेस येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होता नये -आ. वैभव नाईक

आंगणेवाडी जत्रेस येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होता नये -आ. वैभव नाईक

आंगणेवाडीत जत्रोत्सव नियोजनाचा आ. वैभव नाईक यांनी घेतला आढावा

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज पुन्हा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आंगणेवाडीत प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण जत्रोत्सव नियोजनाचा आढावा घेतला. गर्दीच्या नियोजनासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, तसेच पोलीस यंत्रणा, आरोग्य पथक, अग्नीशमन यंत्रणा, आपत्कालीन व्यवस्था,वाहतूक व्यवस्था, पार्कींग व्यवस्था याचा आढावा घेत जत्रेस येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होता नये याची काळजी घेण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना केल्या. जत्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन, देवस्थान मंडळ तसेच आंगणेवाडीतील ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.


यावेळी मालवण तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, देवस्थान मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले,पोईप विभाग प्रमुख विजय पालव, माजी उपसभापती छोटू ठाकूर, सरपंच गिरीजा पालव, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर, मर्डे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच राजेश गावकर,देवस्थान मंडळाचे मधू आंगणे, बाबी आंगणे, छोटू आंगणे, सीताराम आंगणे, बाबू आंगणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा