*आंगणेवाडी वार्षिक उत्सव 2022 करिता आंगणे कुटुंबियांकडून भाविकांना आवाहन*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या श्री.भराडी देवीचा उत्सव दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडत असून देशभरातून लाखो भाविक आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. जत्रोत्सवाला आलेल्या अनेकांचा मागील वर्षाचा नवस फेडायचा असतो तर कित्येक भाविक मोठ्या आशेने नवसाला पावणारी देवी म्हणून देवीकडे नवस करण्यासाठी येत असतात, तर अनेक भावी राज्यभरातून देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावतात. जिल्हाभरातून सरकारी एसटी गाड्या तसेच खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात आंगणेवाडीकडे येत असतात. आंगणेवाडीच्या ग्रामस्थांकडून तसेच जिल्हा प्रशासनाकडून व्यवस्थितरित्या जत्रोत्सवाचे नियोजन केले जाते. जत्रोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता गर्दीत एकमेकांपासून चुकामूक होण्याचे प्रकार तसेच मुले हरवण्याचे प्रकार होतात. अशावेळी ग्रामस्थांकडून स्पीकरवर अनाउन्समेंट करून त्याबाबत सूचना दिली जाते, परंतु जत्रोत्सवासाठी असणारी गर्दी लक्षात घेता सर्वांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून श्री.भराडी ची सर्वत्र ख्याती आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, त्याचप्रमाणे राज्यभरातील अनेक मंत्री आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी या जत्रोत्सवाला मोठ्या भक्तिभावाने उपस्थित असतात. आंगणे कुटुंबीयांकडून जत्रोत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाचे नियोजन घरोघरी केले जाते. परंतु जत्रोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेता कुटुंबीयांकडून खालील प्रमाणे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांनी देवीचे दर्शन तथा जत्रोत्सवाचा आनंद लुटत असताना सूचनांचे पालन करून योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
◆आंगणे कुटुंबियांच्या वार्षिक उत्सवात श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत.
◆आंगणे कुटुंबीयांनी निश्चित केलेली दर्शनाची व ओटी भरण्याची वेळ पुढील प्रमाणे असेल
पहाटे 3.00 वाजल्यापासून सुरू झालेले दर्शन रात्र 9.00 वाजेपर्यंत चालू राहील.
रात्रौ 9.00 ते पहाटे 2.00 पर्यंत दर्शन व ओटी भरणे धार्मिक विधी साठी बंद राहील.
◆पहाटे 2.00 नंतर दर्शन व ओटी भरणे पूर्ववत सुरू होईल याची नोंद यात्रेकरूंनी घ्यावी आणि कुटुंबियांना सहकार्य करावे.
◆आज पहाटे सुरू झालेले दर्शन व ओटी भरणे रात्रौ 9.00 वाजता धार्मिक विधीसाठी बंद करण्यात येईल त्यानंतर पुन्हा रात्रौ 2.00 वाजता दर्शन व ओटी भरणे पूर्ववत सुरू होईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी आणि त्यानुसारच पुन्हा उभे राहण्याचे आपण नियोजन करावे.
◆कृपया सर्वांनी रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने मास्क घालूनच दर्शनाचा लाभ घ्यावा.
◆रांगेतून पुढे सरकत असताना दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर राहील याची काळजी घ्यावी, आपल्यासारखेच इतरही भाविक आपल्यामागे दर्शनासाठी उभे आहेत त्यांचाही विचार आपण करावा.
◆दर्शन झाल्यावर शिस्तीने प्रसाद घ्यावा.
◆स्वयंसेवकांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे, स्वयंसेवकांना आणि पोलिस बांधवांना सहकार्य करावे.
◆अफवांवर विश्वास ठेवू नये.
◆कुठेही संशयास्पद वस्तू आढळली तर स्वयंसेवक किंवा पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणावी.
◆सुरक्षेनिमित्त पोलिसांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे.
◆कुठेही गडबड गोंधळ करू नये.
◆लहान मुलांचे हात सोडू नका त्यांना सोबत ठेवावे.
◆लहान मुलांच्या खिशात तुमचा पत्ता,फोन नंबरची चिठ्ठी जरूर ठेवावी.
◆एकमेकांशी चुकामुक टाळण्यासाठी भेटण्याचे एकच ठिकाण अगोदरच ठरवून ठेवावे.
◆वार्षिक उत्सवात फिरताना खिसा, पाकीट सांभाळावे.
◆महिलांनी आपले किमती अलंकार सांभाळावेत.
◆कुठेही कचरा, फळांची आवरणे, कागदाचे तुकडे टाकू नयेत
कृपया कचराकुंडी चा वापर करावा
◆कुठेही घाण करू नका, स्वच्छता राखा.
कुठेही थुंकू नका, त्याने रोग पसरण्याची शक्यता असते.
◆कृपया सहकार्य करावे.
◆प्लास्टिकचा वापर टाळा.
*◆सर्वांनी कोरोना नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.मुखपट्टी (मास्क) आणि सुरक्षित अंतर ठेवूनच मंदिर परिसरात प्रवेश करावा.◆*