You are currently viewing क्षणिक विश्वास

क्षणिक विश्वास

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या कवयित्री विद्या जगताप यांची काव्यरचना

क्षणिक विश्वास

श्वासातला” क्षणिक विश्वास” तो ..
तुम्ही ओळखता का त्याला..?
क्षणिक बसतो..
तुमच्या आमच्यावर.. .
देवावर ठेवतो अपेक्षांचे ओझे
दगडातला देवच तो..!
जीवाला जीव देणारा…
समोरचा आपला..
नात्यातला सक्खा !
मनातला आधार..
कधी खचतो..
कधी पडतो एकटा…
कधी निराधार.. !
सख्खे -परके जणू आपलेच
सातासमुद्रापारही जुळतात..
येतो कामाला अन वेळेला
जीवाला जीव देतो
आज हरवला तो
छोटयाशा चाळीत.. !
आज हरवला एका..
सुंदर फ्लॅटमध्ये… !
पहिले का हो कोणी..?
पोलीस स्टेशनंला तक्रार घेणार का हो?
कशी काय वाट चुकला .??
काय त्याचा रुबाब..
अहाहा. !
एकदम झक्कास !
मनापासून..
केले प्रेम त्यांच्यावर..
न सांगताच निघाले..
आपल्या गावी.. !
तुम्हाला सापडला तर…
ठेवा तुमच्या कुशीत !
मीही बघते..
कसा ‘एकला ‘पडतो तो !
आज त्याची सुट्टी…
नाही भेटला तर..
घेणार कट्टी… !
“एकला श्वासच तो….
आपल्यातला “क्षणिक विश्वास “….!!!
✍️ .. सौ. विद्या संदिप जगताप. जेजुरी, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा