You are currently viewing दिव्यांगासाठी रेल्वे पास कार्यालय सिंधुदुर्गात हवे

दिव्यांगासाठी रेल्वे पास कार्यालय सिंधुदुर्गात हवे

एकता दिव्यांग ची जिल्हाधीकार्‍यांकडे मागणी.

सिंधुदुर्गनगरी

रेल्वे सवलत पास काढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्यातील दिव्यांगाना रत्नागिरीला जावे लागते त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो, म्हणून रेल्वे सवलत पास काढण्याचे कार्यालय आपल्या सिंधुदुर्ग जिल्यात सुरु करण्यात यावे आदी मागण्यासाठी एकता दिव्यांग विकास संस्था, कणकवली यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांकडे निवेदन सादर केले आहे.

एकता दिव्यांग विकास संस्था, कणकवली यांनी जिल्हाधिकारी यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे, दिव्यांग बांधवांसाठी सर्व पंचायत समितीमध्ये सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात यावे, दिव्यांग बांधवासाठी आवश्यक असणारी अंत्योदय योजना सुरु करण्यात यावी, प्रत्येक ग्रामपंचायतीत दिव्यांगांसाठी स्वतंत्र नोंद वही ठेवणे, दिव्यांगासाठी रोजगार व स्वयं रोजगार मेळावे आयोजित करावेत, जिल्हा परिषदेत दिव्यांग कक्ष स्थापन करण्यात यावा, दिव्यांग बांधवाना लागू असणारी पेन्शन हि दिव्यागाचा पाल्य २५ वयाचा झाल्यानंतर सदरची पेन्शन बंद करण्यात येते ती पेन्शन बंद न करता आजीवन पेन्शन देण्यात यावी, रेल्वे सवलत पास काढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्यातील दिव्यांगाना रत्नागिरीला जावे लागते त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो , म्हणून रेल्वे सवलत पास काढण्याचे कार्यालय आपल्या सिंधुदुर्ग जिल्यात सुरु करण्यात यावे, या मागण्या एकता दिव्यांग विकास संस्था, कणकवली यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. यावेळी एकता दिव्यांग विकास संस्था, कणकवली चे अध्यक्ष सुनील सावंत, संदीप पवार, संतोष कांबळी, बाळकृष्ण बावकर, अमर जाधव, सुनील परब उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा