You are currently viewing !! श्रीराम !!

!! श्रीराम !!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार, संगीतकार, गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना*

 

*जाणजाणताजा युगपुरुष शिवाजी महाराजांना जयंती निमित्त मानाचा मुजरा!*

 

छत्रपती शिवाजी जपती रयत

पाहती हिंदवी स्वराज्याचे स्वप्न।।ध्रु।।

 

माता जिजाऊ कोंडदेव तुकाराम

गुरु आदर्श रामदास निष्काम

हिंदू राष्ट्र निर्मिती मनी ध्येयासक्त।।1।।

 

गुर्जर बाजीप्रभू हिरोजी तान्हाजी

पिंगळे मोहिते मुरारबाजी नेताजी

अष्टप्रधान मानती शिवबांचा शब्द।।3।।

 

प्रजाहित द्रष्टे घेती योग्य निर्णय

भगवा हाती घोषीती भवानी माय

जाणता राजा शिवाजी करी प्रेरित ।।3।।

 

निश्चयाचा महामेरू जनासी आधार

यशवंत नितीवंत शिवअवतार

राजे शिवाजी किर्तीवंत योगी श्रीमंत।।4।।

 

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन 410201.

Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + nineteen =