सावंतवाडी :
मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील मराठा समाजच्यावतीने लाखो सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका मराठा समाजच्यावतीने आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना मराठा समाज बांधवांच्या माध्यमातून २६१३२ सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, सचिव आकाश मिशाळ, बांदा अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, नगरसेवक बाबू कुडतरकर, राकेश परब, पुंडलीक दळवी, अभिमन्यू लोंढे, चंद्रकांत राणे, महेश धुरी, नाना सावंत, अभिलाष देसाई,निलेश मोरजकर, प्रशांत देसाई, अमेय मोरे, प्रभाकर गावडे, सुनील सावंत, दीपक गावकर, उमेश गावकर, मधु देसाई, ज्ञानेश्वर सावंत,सतीश बागवे, सूर्यकांत पालव, आदि उपस्थित होते.