जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना
कित्येक पहिले मी हे लोक चाललेले
पोचायचे कुठे ना कोणीच जाणलेले
होता आवेग थोडा वेगात कुणी जाई
चेहराच आंनदी मन चिंतेत ग्रासलेले
ओझेच अपेक्षांचे प्राप्ती स्वतः स कोठे
फळभार पेलणारे जणु झाड वाकलेले
होता प्रवाह नुसता वाहेल तिथे वाहे
अंदाज ना कशाचा का मार्ग रोखलेले
अंतीम सत्य एक कोणी कुणा न सांगे
कुणी वाट सोडली कुणी वाट विसरलेले
त्यागात सत्य लपले हे सत्य त्यागताना
भोगात विसरू पाहि जे भोग भोगलेले
प्रत्येक इथे आहे जरी अंश ईशवराचा
त्याच्याच उपेक्षेने ते वरदान लोपलेले
संपे प्रवास जेंव्हा मग अहं च्या कुशीत
चुकले कळून चुकते आभास भासलेले
स्वप्ना परीच वाटे तो आनंद जीवनाचा
जागेपणी रहाती कां मग हात जोडलेले
विघ्नेश्वरा आता घ्यावे सांगून तू निरोपा
निर्माल्य उरे प्रेमाविण हे हार वाहिलेले
अरविंद
9960267354