जागतिक मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त माझी स्वरचित काव्यरचना
माझ्या मराठीची महती.
माझी मराठी, मराठी,
गोडी अमृताची तिची,
सातासमुद्रापार गुंजते,
मायबोली मराठी माझी ||१||
वाणी अमृत ज्ञानियाची,
गाथा तुकोबाची अभंगवाणी,
माझ्या बहिणाईची गाणी,
पडती महाराष्ट्राच्या कानी ||२||
माय मराठीच्या गाभाऱ्यात,
आद्य कवींच्या काव्यांची आरास,
शब्दांलकाराच्या शृंगाराचं येई,
मराठी साहित्य भरास ||३||
माझी मराठी, मराठी,
आहे लोककलेची नगरी,
संगीत सप्तसुरांच्या लाटा,
उसळुनी येती या सागरी ||४||
माझ्या मराठीच्या भाली,
शोभे संस्कृतीचं गोंदण,
सांगे मराठीची महती,
गाथा सप्तशतीचं चांदणं ||५||
माझ्या मराठीच्या भूमीत,
भिन्न वेशभुषा अन् भाषा,
नांदे ऐक्य धरुनी एकसंघ,
मराठीच देई जगण्याची अशा ||६||
कवी प्रविण खोलंबे.
मुरबाड,जि. ठाणे.
संपर्क – ८३२९१६४९६१