दशावतार कला ही कोकणची परंपरा आहे. हि परंपरा जोपासणाऱ्या दशावतारी कलाकारांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच उभी राहिली असून वेळोवेळी त्यांना मदतीसाठी पुढाकार घेत असते. नटश्रेष्ठ दशावतारी लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांचे अकाली निधन झाल्याने शिवसेना पक्षाचे कोकणचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, विधानसभेतील शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू, खासदार राहूल शेवाळे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार रमेश कोरगावकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, भाऊ कोरगावकर यांनी एकत्रित रित्या ५ लाख रु. ची आर्थिक मदत कै. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
कै. सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुडाळ येथील बॅ. नाथ पै. शिक्षण संस्थेच्या सभागृहात आज शोकसभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी हि आर्थिक मदत कै. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आली.याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जी. प. सदस्य संजय पडते, संदेश पारकर, सिने अभिनेते दिंगबर नाईक, तहसीलदार अमोल पाठक , कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, पंचायत समिती सदस्य अंकुश जाधव, राजन नाईक, बबन बोभाटे, अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष दिनेश गोरे, उपाध्यक्ष समीर तेंडुलकर, देवेंद्र नाईक,राजा सामंत, अनिल हळदीवे, राजू कलिंगण, दशावतारी कलाकार उदय राणे कोनसकर , दादा कोनसकर, आनंद कोनसकर, राधाकृष्ण नाईक, दत्तप्रसाद शेणई, मारुती सावंत आदिंसह सुधीर कलिंगण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.