नवी दिल्ली:
देशात कोरोनाचा उद्रेक कायम आहे.दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या २४ तासात देशात पुन्हा ८२ हजार १७० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर १ हजार ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं जगभरात सुमारे ६० लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ६० लाख ७४ हजार ७०३ एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात ९ लाख ६२हजार ६४० जणांवर उपचार सुरू आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत कोरोनामुळे सुमारे ९५ हजार ५४२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान जगभरातील कोरोना आकडेवारीचा जर आपण विचार केला तर, अमेरिकेनंतर भारतात आतापर्यंत सुमारे ७,१९,६७,२३० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकीं ६० लाख जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. जगभरातील सुमारे २०० पेक्षा जास्त देशात कोरोनाचा हाहाकार कायम आहे. कोरोनाग्रस्तांच्या बाबतीत अमेरिका अव्वल क्रमांकावर असून, त्यापाठोपाठ भारत दिसऱ्या क्रमांकावर आहे.
दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे ५० लाख १६ हजार ५२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढला असून, भारताचा रिकव्हरी रेट हा ८२.५८ टक्के एवढा झाला असून, अॅक्टिव्ह रुग्णांचा रेट हा १५.८४ टक्के एवढा आहे.