सुरक्षा रक्षक मंडळाच्या १८० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले. म्हणून मा.राजसाहेब व अमित ठाकरे साहेबांच्या नेत्रुत्वाखाली, मा.मनोज चव्हाण, मा.संतोष धुरी, मा. गजानन राणे व मा. हाजी असगरभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा रक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बँक ऑफ इंडियाच्या बीकेसी येथील मुख्यालयात धडक दिली.
यावेळी बीकेसी पोलीस ठाण्याचे डीसीपी, IPS श्री. स्वामी साहेबांनी मध्यस्थी करून बँक व्यवस्थापन व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित मिटिंग ठेवली. यावेळी सदर सुरक्षा रक्षकांचा सहानुभूतीने विचार करावा, असे आवाहन संघटनेतर्फे श्री गजानन राणे व हाजी असगरभाई शेख यांनी व्यवस्थापनाला केले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर तळावडेकर, सरचिटणीस देवेंद्र पाटील, यांच्या सह पदाधिकारी श्री. गुरदिपसिंग डोगरा, नितीन सारंग,सत्यजित गायकवाड, नितीन समूद्रे, महेश देढे, अशोक शिंदे, समीर कांबळे व शेकडो सुरक्षा रक्षक उपस्थित होते.
*सुरक्षा रक्षका जागा हो,*
*नव्या क्रांतिचा धागा हो*