You are currently viewing अमेरिकेत टिकटॉक(tiktok) आणि विचाट(we chat )बंदीला स्थगिती…

अमेरिकेत टिकटॉक(tiktok) आणि विचाट(we chat )बंदीला स्थगिती…

वॉशिंग्टन वृत्तसार:

भारताने दणका दिल्यानंतर अमेरिकेनेही चिनी अ‍ॅप Tiktok, We Chat वर बंदी घातली होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला तेथील संघीय न्यायालयाने धक्का दिला असून ही बंदी स्थगित केली आहे. अमेरिकेमध्ये १९ सप्टेंबरपासून Tiktok, We Chat वर बंदी लादण्यात आली होती. टिकटॉकचे अमेरिकेत १० कोटी वापरकर्ते आहेत.
अमेरिका संघराज्यांच्या न्यायाधिशांनी मध्यरात्रीपासून ट्रम्प यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मात्र, नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या एक आठवड्यानंतर ही बंदी पुन्हा सुरु होणार आहे. अमेरिकेच्या कोलंबिया न्यायालयाचे न्यायाधीश कार्ल निकोलस यांनी नोव्हेंबरमध्ये लागू होणाऱ्या या बंदीवर मात्र स्थगिती देण्य़ास नकार दिला आहे.
निकोलस यांच्या खंडपीठासमोर रविवारी सकाळी आपत्कालीन सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीवेळी टिकटॉकच्या वकिलांनी कंपनीच्या आणि नागरिकांच्या संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याची बाजू मांडली होती. तसेच व्यवसायही प्रभावित होणार असल्य़ाचे म्हटले होते. जज यांनी यावर निर्णय जाहीर केला असला तरीही त्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केलेल नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा