You are currently viewing श्री क्षेत्र माणगाव दत्त मंदिर येथे मंगळवार 15 फेब्रुवारी ते शुक्रवार 18 फेब्रुवारी पर्यंत श्री विष्णुदत्त यागाचे आयोजन

श्री क्षेत्र माणगाव दत्त मंदिर येथे मंगळवार 15 फेब्रुवारी ते शुक्रवार 18 फेब्रुवारी पर्यंत श्री विष्णुदत्त यागाचे आयोजन

भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे श्री दंत्त मंदिर विश्वस्त मंडळाचे आवाहन

कुडाळ

माणगाव येथील श्री दत्त मंदिर येथे मंगळवार 15 फेब्रुवारी ते शुक्रवार 18 फेब्रुवारी पर्यंत श्री विष्णुदत्त यागाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनास तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे माणगाव दत्त मंदिर येथे श्री विष्णू दत्तयाग निमित्त मंगळवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी7-00 वाजल्यापासून अखंड नामस्मरण बुधवार 16 फेब्रुवारी रोजी ग्रामदेवता श्री यक्षिणी श्रींचे जन्मस्थानी व प.पू. नांदोडकर स्वामी समाधी स्थानावर अभिषेक पूजा पुण्याहवाचन यज्ञमंडप देवता स्थापना ग्रह वास्तू हवंनदिक धार्मिक विधी प्रारंभ दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद त्यानंतर दुपारी गुहेवर श्री सत्यदत्त पूजा व तीर्थप्रसाद दू.3ते5 दुपारी1-30 वा. श्री सिद्धेश वेंगुर्लेकर व सहकारी माणगाव स्वररस दुपारी तीन वाजता यशोदा सामाजिक विकास संस्था शंकर ताम्हणे कर व सहकारी यांचे सुश्राव्य गायन 4- 30 वा.प्रसाद शेवडे व सहकारी देवगड प्रस्तुत भक्ती नाट्य धारा सायंकाळी आरती श्रींचा पालखी सोहळा व ह भ प श्री संदीप मांडके पुणे यांचे सृश्राव्य कीर्तन गुरुवार 17 फेब्रुवारी रोजी सकाळी पूजा विधी व श्रीविष्णू दत्तयाग जप व हवन दुपारी आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद दुपारी 1-30 वाजता सौ समीक्षा काकोडकर गोवा व सहकारी प्रस्तुत भक्ती नाट्यरंग दुपारी तीन वाजता ओमकार देवस्कर व सहकारी मुंबई यांचे सुश्राव्य गायन सायंकाळी 5-00 वा.लिव्ह इन म्युझिक कणकवली प्रस्तुत श्री रंजन वाळके आणि धीरज काणेकर आयोजित भक्ती स्मरण सुगम सगीताचा कार्यक्रम सायंकाळी आरती श्रींचा पालखी सोहळा व रात्री 8-3 0वा ह.भ.प.श्री संदीप मांडले पुणे यांचे सुश्राव्य किर्तन शुक्रवार 18 फेब्रुवारी रोजी दत्त मंदिरात सकाळी 8-00 वा. पासून अभिषेक महापूजा सकाळी श्री विष्णूदत्त याग बलिदान पूर्णाहुती. महानैवेद्य आरती मंत्र पुष्प दुपारी आरती व महाप्रसाद दुपारी 1-3 0वा.श्री प. प. टेंबे स्वामिंच्या पदांचा बहारदार कार्यक्रम सादरकर्ते श्री दीपक नानचे व सहकारी माणगाव ,दुपारी 3-0 0वा. राधाकृष्ण संगीत साधना सौ.वीणा दळवी व सहकारी आजगाव यांचे गायन,4-3 0वा.श्री पर्फुल्ल विलास रेवांडकर व.सहकारी यांचे गायन संध्या.6-3 0वा.आरती श्रींचा पालखी सोहळा रात्री8-30वा. श्री. ह.भ. प. संदीप मांडले पुणे यांचे कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत तरी सर्व भाविकांनी दर्शनासह तीर्थप्रसाद व.महाप्रसाद याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर विश्वस्त मंडळ तर्फे करण्यात आले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा