*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखिका कवयित्री श्रीम.उज्वला कोल्हे यांची काव्यरचना*
*पादाकुलक वृत्त..(८+८)*
*ऋतू..*
*चक्र ऋतूंचे अविरत फिरते*
*चित्र धरेचे बदलत असते*
*कोण कळेना करते जादू*
*लोभसवाणी धरणी सजते*
*वसंत देतो नवी पालवी*
*वृक्ष बहरती निसर्ग शोभा*
*कोकीळ कुहू सुमधुर गाणे*
*सृष्टी फुलते प्रसन्न आभा*
*ग्रीष्म ऋतूचा दाह उन्हाचा*
*आग ओकतो सांजसकाळी*
*गुलमोहरही लाल केशरी*
*सुखावते मन रानोमाळी*
*वर्षा करते धरेला नवी*
*हिरवा शालू परिधान करी*
*झाडे डुलती वा-यासंगे*
*गंधित माती जशी कस्तुरी*
*शरदामध्ये पडते थंडी*
*टपोर त्याचे असे चांदणे*
*चंद्र पाहता मग पुनवेचा*
*या डोळ्यांचे फिटे पारणे*
*हेमंताचा ऋतू गोजिरा*
*शीत गारवा देत शिरशिरी*
*भूवर पसरे शाल धुक्याची*
*हुडहुडी भरे हवा बोचरी*
*रूप आगळे या शिशिराचे*
*पिवळी पाने गळुनी जाती*
*नवीन फुटते पुन्हा पालवी*
*सुखदुःखाची शिकवण देती*
*सहा ऋतूंचे सहा सोहळे*
*अनुभव आहे जरा वेगळे*
*सृष्टीचा हा खेळ अनोखा*
*प्रत्येकाचे तत्व निराळे*
*…………✍*
*👉उज्ज्वला कोल्हे,uk*
*कोपरगाव*