You are currently viewing कलाकारांना अर्थसहाय्य करण्यासाठीची जिल्हास्तरीय समिती स्थापन

कलाकारांना अर्थसहाय्य करण्यासाठीची जिल्हास्तरीय समिती स्थापन

सिंधुदुर्गनगरी

कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे नाट्यगृहे, चित्रपटगृहे बंद असल्याने कलाकारांना कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित रहावे लागले होते. त्याअनुषंगाने प्रयोगात्मक कलेच्या प्राकारातील कलाकार, कलासमुह यांना अर्थसहाय्य करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रयोगात्मक कलेतील करालाकारांच्या व संस्थांच्या निवडीसाठी जिल्हास्तरीय निवड समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

            या आदेशात म्हटले आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण राज्यासह देशात लॉकडाईन लागू होता. तसेच लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांच्या बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित रहावे लागले होते. याकाळात सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटीत व असंघटीत कलाप्रकारातील विविध कलाकार, ज्यांचे उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे असे आहे.

            राज्यातील प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील कलाकार, कलासमुह यांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य करण्यात तसेच स्थानिक प्रयोगात्मक कलेतील कलाकारांच्या व संस्थांच्या निवडीशी संबंधित प्रशासकीय खर्चास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. 3 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे व सदर एकल कलाकारांच्या पात्र अर्जावर उचित निर्णय घेण्यासाठी जिल्हास्तरीय निवड समिती गठित करणे आवश्यक आहे.

            जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग पुढीलप्रमाणे जिल्हास्तरीय निवड समिती गठित करीत आहेत. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग – अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग – सदस्य, मुख्याधिकारी, नगरपालिका – सदस्य, जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग – सदस्य, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी, सिंधुदुर्ग – सदस्य, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प., सिंधुदुर्ग – सदस्य, कलाक्षेत्राशी निगडीत सन्माननीय कलाकार – सर्व सदस्य – बाळकृष्ण गोविंद नामये – वैभववाडी ( संगीत बारी), बाळकुष्ण आत्माराम बोभाटे – वैभववाडी (संगीत बारी), भालचंद्र दिगंबर केळुसकर – मालवण ( संगीत बारी), सुहास मोहन माळकर – मालवण ( दशावतार), यशवंत नारायण थोटम – देवगड (दशावतार), विद्याधर विश्वनाथ कोर्लेकर – देवगड ( नाटक), देवेंद्र मोरेश्वर नाईक – कुडाळ (दशावतार), अमित दिनकर मेस्त्री – कुडाळ ( संगीत बारी), सुभाष नारायण लोंढे – दोडामार्ग (दशावतार), कृष्णा यशवंत नाईक – दोडामार्ग (दशावतार), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सिंधुदुर्ग – सदस्य

            सदर जिल्हास्तरीय निवड समितीने खालील अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक राहील.

            1) सदर समिती छाननी समितीकडील प्राप्त अर्ज तपासून पात्र अर्जावर उचित निर्णय घेणेची कार्यवाही करतील.

            2) पात्र केलेल्या कलाकारांची यादी विहित तपशिलासह संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई याजकडे सादर करतील.

            3) संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हाधिकारी यांच्याकडून शिफारस करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांची बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करतील.

00000

प्रतिक्रिया व्यक्त करा