You are currently viewing वर्दे येथे तलाठी कार्यालयाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

वर्दे येथे तलाठी कार्यालयाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

रास्त भाव धान्य दुकान व ग्रा.पं.सभागृहाचे उदघाटन तर सातेरी मंदिर रस्त्याचेही भूमीपूजन संपन्न

वर्दे गावात गेली अनेक वर्षे मागणी असलेले तलाठी कार्यालय आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून आज त्यांच्या हस्ते या तलाठी कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. त्याचबरोबर वर्दे येथे रास्त भाव धान्य दुकान व , वर्दे ग्रामपंचायत येथे १४ वा वित्त आयोग अंतर्गत बांधलेले छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे उदघाटन, व वर्दे मुख्य रस्ता ते सातेरी मंदिर जाणारा रस्ता निधी ५ लाख या कामाचे भूमीपूजन आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


शिवसेनेच्या माध्यमातून वर्दे गावातील महत्वाची विकास कामे मार्गी लावण्यात आली आहेत. यामुळे येथील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. उर्वरित कामे येत्या काळात मार्गी लावली जातील, वर्दे गावातील रास्त भाव धान्य दुकान हे सिंधु साफल्य स्वयं सहाय्य्यता महिला बचत गटाने चालवण्यास घेतले हि कौतुकास्पद बाब आहे. यातून बचत गटाचे उत्पन्न वाढेल.असे अनेक उपक्रम बचत गटाच्या माध्यमातून राबवून महिलांनी आपली उन्नती साधावी असे आ. वैभव नाईक यांनी याप्रसंगी सांगितले.


यावेळी विभाग संघटक संदीप सावंत,पंचायत समिती सदस्य शीतल कल्याणकर, सर्कल डी. व्ही. तेली, तलाठी ए. आर. अरखकर, सरपंच अपर्णा सुतार, उपसरपंच विष्णू सावंत, ग्रामसेवक एल. जी. कविटकर, माजी विभाग प्रमुख पप्पू पालव, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख अनुराग सावंत, शाखा प्रमुख सुनील सावंत, दिलीप सावंत, बाळा कुंभार, रुपेश सावंत, किरण पालव, कडावल उपसरपंच विद्याधर मुंज, हनुमंत पालव, निलेश जाधव, सुहास सावंत, सोनाली सावंत, प्रमिला कुंभार, जोसना कुंभार, सुनील राणे, स्नेहल कुंभार, मोहिनी वर्देकर, विश्वनाथ पालव, अमित कल्याणकर,गुरुनाथ मुंज, समेश गावकर, राखी सावंत, दीपाली सावंत, दिव्या सावंत, सागर पालव, शाम सावंत, शरद सावंत, बंडू सावंत, बाळा सावंत अनिव्रुद्ध कल्याणकर, नीव्हेकर, निवूत्ती सावंत, बाळकृष्ण सावंत, सुबोध सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा