मालवण :
भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सवलतीच्या दरात सवलतीच्या दरात आटा चक्की व वॉटर फिल्टर वितरण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुडाळ नंतर मालवण मध्येही जनतेच्या आग्रहास्तव ११ ते २१ फेब्रुवारी रोजी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहासमोर ५०% सवलतीच्या दरात नागरिकांना आटाचक्की आणि वॉटर फिल्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
भाजप नेते निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून कुडाळ मध्ये ५०% सवलतीच्या दरात आटा चक्की आणि वॉटर फिल्टर उपलब्ध करून देण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जनतेच्या आग्रहास्तव मालवण मध्ये देखील हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ११ ते २१ फेब्रुवारी पर्यंत शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहासमोर नागरिकांना या वस्तू उपलब्ध होणार आहेत.
या सुविधेचा लाभ मिळण्यासाठी आधारकार्ड आणि रेशनकार्डची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तरी ११ ते २१ फेब्रुवारी पर्यंत आयोजित या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी केले आहे.