जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सचिन मस्कर यांची काव्यरचना*
*तूच आहेस माझी चॉकलेट..🍫🍫*
तू असताना नको वाटते
टेबलवरची भज्जी प्लेट
स्वीट स्वीट होते दिल माझे
तूच आहेस माझी चॉकलेट..
तुझ्या बोलण्यातच होते
ओपन माझ्या दिलाचे गेट
जिभेवर जणू साखर तुझ्या
तूच आहेस माझी चॉकलेट..
सर्च करतो चॉकलेट जेव्हा
तेव्हा तुलाच दाखवते इंटरनेट
गुगललाही भुरळ पडली तुझी
तूच आहेस माझी चॉकलेट..
चॉकलेटमय होतो क्षण तेव्हा
जेव्हा होते तुझी अन् माझी भेट
चॉकलेटचे दुसरे नाव आहेस तू
तूच आहेस माझी चॉकलेट..
©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई