*नितेश राणे अंगार है…. बाकी सब भंगार है !!!*
कुडाळ :
गेले काही दिवस आमदार नितेश राणे प्रकरणात सरकारकडून चाललेल्या दडपशाहीचा राग आज कुडाळ भाजपा कार्यकर्त्यानी व्यक्त केला. नितेश राणे यांना न्यायालयाने जामिन दिल्याचा जोरदार आनंद कार्यकर्त्यांनी कुडाळ कार्यालयासमोर जोरदार फटाके लावून साजरा केला. यावेळी नितेश राणे अंगार है, बाकी सब भंगार है, गली गली मे शोर है – ठाकरे सरकार चोर है अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी वातावरण दणाणून सोडले.
यावेळी भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष श्री विनायक राणे, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, अविनाश पराडकर, चंदन कांबळी, प्रसन्ना गंगावणे, साई दळवी, दिनेश शिंदे, संदेश सुकळवाडकर, मनोरंजन सावंत, विनोद सावंत आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते