You are currently viewing श्रीमती संघटना – ब्रीदवाक्य _नाही मी सधवा, नाही मी विधवा, मी आहे श्रीमती

श्रीमती संघटना – ब्रीदवाक्य _नाही मी सधवा, नाही मी विधवा, मी आहे श्रीमती

सावंतवाडी येथील सालईवाडा मधील सार्वजनिक गणपती मंदिरात आज रोजी विधवा महिलांकरता हळदी कुंकू तिळगुळ समारंभ आयोजित करण्यात आला होता
प्रस्तुत कार्यक्रम हा *श्रीमती संघटना* यांच्यातर्फे रथसप्तमी चा मुहुर्त साधून करण्यात आला
सदर कार्यक्रमास जवळ जवळ 60 ते 70 विधवा महिला उपस्थित होत्या पैकी तारामती सहदेव बोरुडे, शैला विलास पटेकर ,वासंती वामन गवळी, राजश्री राजेंद्र काटाळे, व स्मिता दिगंबर राणे, सुमित्रा गजानन गवस, ललिता धोंडू परब, विजया विनया शृंगारे ,नम्रता रामकृष्ण केसरकर, क्रांती सुभाष मिसाळ, गीता गोविंद साबळे ,रामीरामा कोळेकर ,सुनीता नारायण वाडकर,मंदा दत्तात्रय वाडकर, संध्या शरद भोसले ,वंदना दशरथ पाटणकर ,आशालता देवदास वेंगुर्लेकर, जयश्री विनायकराव सावंत, दर्शना दत्‍ताराम मडगावकर, मीना विजय वाडकर ,अश्विनी म्हापसेकर प्रभावती आंबेडकर, सुनिता धामापुरकर, भारती भालचंद्र निरवडेकर ,सरिता काशिनाथ आसोलकर ,जानकी रामचंद्र आंबेडकर ,सुनंदा चंद्रकांत खडपकर, सुरेखा दामोदरे रेमने, सविता नारायण सावंत ,निर्मला घनश्याम पाटणकर, प्रज्ञा सावंत ,सरस्वती शशिकांत पाटणकर ,इत्यादी महिला उपस्थित होत्या.


सदर श्रीमती संघटना ही विधवा महिलांसाठी काम करणारी संघटना असून सदर संघटनेचे मुख्य पदाधिकारी या ॲड नीता कविटकर सावत असून . एडवोकेट नम्रता नेवगी तसेच आयर्न डिसा,संध्या मोरे कदम इ. आहेत सदर संघटनेच्या सर्व सदस्यांसह आज जवळ जवळ 60 ते 70 महिलांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमांमध्ये आज सर्व विधवा महिलांकरिता असलेल्या विविध योजनांची माहिती पंचायत समितीत कार्यरत असलेल्या सौ संध्या मोरे कदम मॅडम यांनी दिली तसेच कायदेविषयक माहिती एडवोकेट नम्रता नेवगी यांनी दिली एकंदरीत सर्व कार्यक्रम हा हसत खेळत पार पडला सदर कार्यक्रमास अंतर्गत बहुसंख्य महिलांनी आपल्या मनात असलेल्या अनेक भावना मुक्तपणे व्यक्त केल्या व अशा प्रकारचे कार्यक्रम व्हावेत जेणेकरून विधवा झाल्यानंतर स्त्रीला सर्व कार्यक्रमातून बहिष्कृत करण्यात येते तो प्रकार थांबवावा अशी तळमळ आज प्रत्येक उपस्थित असलेल्या महिलेने स्वतः बोलून दाखविले तसेच यापुढेही असे वेगवेगळे कार्यक्रम आमच्यासाठी घ्या असेही आवर्जून सांगितले सदर कार्यक्रमासाठी सदर कार्यक्रम द्वारे आपले मनोगत व्यक्त करतानाॲड कविटकर सावंत मॅडम यानी विधवा मदत होईल तसेच उतार वयात ज्याना काहीच आथिर्क सहाय्य नाही त्याना सरकारमार्फत असलेल्या निरनिराळ्या योजनेचे फायदे मिळवून देण्यासाठी कार्यरत राहण्याचा व तसेच विधवा स्ञीबाबत मानण्यात येणारे समज गैरसमज व अनिष्ट रूढी प्रथा याचे विरुद्ध जनजागृती करण्याचे धाडशो पाऊल उचलण्यात येईल अशा मनोदय व्यक्त केला .

प्रतिक्रिया व्यक्त करा