You are currently viewing दोडामार्गात राजकीय भूकंपाची शक्यता…….

दोडामार्गात राजकीय भूकंपाची शक्यता…….

दोडामार्ग :

दोडामार्गच्या राजकीय पटलावर मोठे उलटफेर होण्याची चिन्हे असून भाजपाचे जिल्ह्यातील युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पद सांभाळणारे व दोडामार्ग उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण व पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य लक्ष्मण उर्फ बाळा नाईक असे दोन पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यासमावेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
यामुळे आधीच विरोधात व त्यात पक्षातील अशा फेबदलामुळे भाजपा पक्ष अडचणीत येऊ शकतो, या भूमिका निश्चित करणाऱ्या चेतन चव्हाण व बाळा नाईक गटाकडे तरुणांचा भरणा जास्त असून निश्चित याचे परिणाम या गटाने पक्ष सोडल्यास आगामी काळात दिसणार आहे.
सध्या जरी ही परिस्थिती जर तर ची असली तरी या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका मात्र भाजपा पक्षासाठी गैरसोयीची ठरू शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा