बांदा
भारताची गानकोळीका लता मंगेशकर यांची विविध प्रकारची स्केचचित्र साकारून बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या ९३व्या वर्षी रविवारी निधन झाले .या सुप्रिध्द गायिकेची पेन्शिल स्केचची चित्र विद्यार्थ्यांनी साकारली. यामध्ये शाळेतील चैतन्या तळवणेकर ,शिवानंद परब,दुर्वा गवस ,नेहा शंभरकर,पूर्वा मोर्ये,गौरांग देसाई ,कनिष्का केणी ,ईश्वरी वावळीये,चिन्मयी रुबजी,रेणूका बामणवाडकर,संजना मौर्या,किमया परब,सोहम निंबाळकर,सलीम खान,श्रेयस बुवा,आदिती मेस्त्री ,श्रृती हळदणकर, वैभव गावीत आदि विद्यार्थ्यांनी चित्र साकारली आहेत.
जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर शाळा भेटीवेळी विद्यार्थ्यांना स्केचचित्रांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक कले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये,रुईजा गोल्सलवीस ,जे.डी.पाटील उपस्थित होते.या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन लाभले.