कुडाळ :
बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दु:खद निधन झाले . त्यांना कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आदरांजली अर्पण करण्यात आली. उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमांमध्ये प्रा.अरुण मर्गज यांनी “व्यक्तिमत्त्वातील शालीनता, नम्रता व हिंदू संस्कृतीचा सात्विक संगीतमय आविष्कार म्हणजे लता दीदी”अशा शब्दात गौरव करत सात ते आठ दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लतादीदी यांच्या संगीतमय जीवन प्रवासाचा परिचय करून देत संगीत साधनेचा आढावा घेतला. शालींता, नम्रता, मृदू, सदाबहार स्वरसाज असलेली, माधुर्याची अवीट गोडी असलेली लतादीदींची गाणी याबद्दल व त्यांना जे विविध पुरस्कार दिले गेले त्या पुरस्कारांचा सन्मान वाढवणाऱ्या लतादीदींच्या कलाकार म्हणून असलेल्या बॉलिवूड तील योगदानाची आठवण करून दिली व संगीतमय दुनियेतील त्यांच्या अव्वल स्थानाबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मीना जोशी उपप्राचार्य कल्पना भंडारी, बी.एड महाविद्यालयाचे प्रा नितीन बांबर्डेकर, ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक अर्जुन सातोस्कर,प्रा.परेश धावडे, सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे, प्रसाद कानडे,प्रा. प्रथमेश हरमलकर, संस्थेच्या एच आर ओ पियुशा प्रभूतेंडोलकर, मिनल ठाकूर, पांडुरंग पाटकर, किरण करंदीकर व विविध अभ्यासक्रमांचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.