You are currently viewing जिह्यातील व्यावसायिकांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सहकार्य करावे :-श्री विष्णू मोंडकर,जिल्हाध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग

जिह्यातील व्यावसायिकांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सहकार्य करावे :-श्री विष्णू मोंडकर,जिल्हाध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग

ओरोस :

 

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्य बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी व उपाध्यक्ष श्री अतुल काळसेकर तसेच नूतन बँक संचालक श्री बाबा परब यांची पर्यटन महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे भेट घेऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेने व्यावसायिकांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी बँकेने सहकार्य करण्याची विनंती पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेकार, महिला बचत गट, मच्छिमार, शेतकरी, व्यापारी व पर्यटन व्यावसायिक यांना व्यवसाय वाढीसाठी व जिल्ह्यात रोजगार निमिर्तीचे मोलाचे कार्य बँकेच्या माध्यमातून होत आहे. गेले दोन वर्षे कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील व्यावसायिक हा उध्वस्त झाला असून त्यांच्या व्यवसायाचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे थकीत कर्जाचे प्रमाण वाढले असून यासाठी बँकेच्या माध्यमातून व्यावसायिकांस दिलासा देण्यासाठी व नवउद्योजकास व्यवसाय वाढीसाठी आर्थिक सहाय्यासाठी बँकेने मदत करावी अशी विनंती महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी केली.

यावेळी बँक अध्यक्ष श्री मनीष दळवी व उपाध्यक्ष श्री अतुल काळसेकर यांनी सांगितले की सिंधुदुर्ग बँक हि व्यावसायिकांच्या सोबत असून बँकेचे कर्ज घेतलेल्या व्यवसायिकांना त्यांचे कर्ज सुलभरित्या भरण्यासाठी बँक नवीन योजना लवकरच जाहीर करेल. तसेच जिल्ह्यातील व्यवसाय वाढीसाठी उद्योजकानां व पर्यटन व्यावसायिक महासंघास बँक पूर्णपणे सहकार्य करेल असे आश्वासन दिले.

यावेळी महासंघ सोशल मीडिया प्रमुख श्री किशोर दाभोलकर ,महासंघ महिला तालुका अध्यक्ष सौ मेघा गावकर, सौ चारुशीला आचरेकर, सौ कासवकर ,महासंघ शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर, तारकर्ली पर्यटन संस्था अध्यक्ष श्री सहदेव साळगावकर, श्री रवींद्र खानविलकर, श्री मिलिंद झाड ,श्री रामा चोपडेकर,श्री दादा वेंगुर्लेकर ,श्री अभय पाटकर ,श्री मिथिलेश मिठबावकर, श्री देवानंद लोकेगावकर व अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा