दोडामार्ग
दोडामार्ग ते विजघर रस्ता पूर्ण पणे डांबरीकरण व्हावा यासाठी अनेक उपोषणे व आंदोलने झालीत. मात्र हा रस्ता मधे मधे डांबरीकरण करण्यात येत आहे. या ३५ किलोमीटर रस्त्याचे मधे मधे डांबरीकरण न करता हा रस्ता संपूर्ण डांबरीकरण व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाला ६ फेब्रुवारी पर्यंत दोडामार्ग ते विजघर रस्ता संपूर्णपणे डांबरीकरण व्हावा अशी रस्ता पूर्ण करण्यासाठी डेटलाइन दिली होती.
मात्र हा रस्ता ६ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक आज साटेली-भेडशी चर्च समोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला नागरिकां कडून पाठिंबा दर्शवीला जात आहे.