You are currently viewing 27 वर्षापासून कार्यरत असणारी नवीन कुर्ली विकास समिती ही एकमेव विकास समिती – अनंत पिळणकर

27 वर्षापासून कार्यरत असणारी नवीन कुर्ली विकास समिती ही एकमेव विकास समिती – अनंत पिळणकर

नवीन कुर्ली विकास समिती आणि या विकास समितीच्या मार्फत गेली 27 वर्षे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा साठी आणि त्यांच्या विकासासाठी आम्ही कार्यरत आहोत गावात इतर काही मंडळी तीन चार महिन्यापूर्वी मंडळ स्थापन करून आम्हीच विकास करू शकतो अशी फुकटची वल्गना करत आहे. अनंत पिळणकर हे या समितीचे अध्यक्ष झाल्यावर मा. जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याने आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मुळे नवीन कुर्ली विकास समिती ला कोट्यावधीचा निधी मिळाला. यासाठी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून प्रसंगी प्रत्यक्षात भेट घेऊन हा निधी मंजूर करून आणला. त्यासाठी मा. जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ साहेब यांचे मनापासून आभार आणि गावाच्या या विकास प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचं काम काही विघ्नसंतोषी माणसे करीत आहेत. ना प्रत्यक्षात पत्रव्यवहार केला ना कोणाला भेटले आणि आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचं श्रेय घेण्यास ही मंडळी तयार आहे. यांनी कोणाकडे पाठपुरावा केला कोणाकडे पत्रव्यवहार केला याचे पुरावे द्यावेत आणि आम्ही केलेला पाठपुरावा आम्ही केलेला पत्रव्यवहार हा तुमच्या समोर आहे. स्वतः आमदार या इथे येऊन विकासाची जबाबदारी माझी सांगून गेले त्या आमदारांना विचारा त्यांनी किती निधी दिला. खुद्द त्यावेळी नारायण राणे पालकमंत्री महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री असताना का निधी मिळाला नाही आणि विकास का नाही झाला हे त्यांनी तपासून पहावे. विकासाच्या प्रक्रियेत फक्त अडथळा बनवण्याचे काम ही मंडळी करत आहेत पण नवीन कुर्ली विकास समिती ही कोणत्याही एका पक्षाशी बांधील नाही सर्वपक्षीय एकत्र येऊन या समितीत काम करतात. भले मी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष असलो तरी मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून यापूर्वी विकासासाठी निधी आणला आणि या पुठेही आणीन. त्यामुळे या समितीच्या विरोधात कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही आणि झोपून या गावाच्या विकासासाठी निधी आणला तर तो गावासमोर मांडावा असे प्रतिपादन नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले.

यावेळी त्यांच्यासोबत नवीन कुर्ली मुंबई मंडळ अध्यक्ष प्रकाश सावंत, विकास समिती सचिव रघुनाथ कुलकर्णी, विकास समिती उपाध्यक्ष सेनापति सावंत, सदस्य सखाराम हुंबे,अरुण चव्हाण, उत्तम तेली, मधुकर चव्हाण, आत्माराम तेली, शंकर राणे, शांताराम पार्के, उपस्थित होते त्याचबरोबर स्नेहा सावंत सुनिता राणे सुभद्रा चव्हाण आरती सुतार सुलोचना चव्हाण देवेंद्र पिळणकर , विजय शेलार, विजय राणे ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा