कोण कोण आहेत तक्षिमदार?
सर्व धंदे बुडीत जात असताना केवळ खाकीला हाताशी धरलं तर एकमेव धंदा लक्षाधीश करू शकतो तो म्हणजे जुगार. गैरधंद्यांच्या नावाने कितीही ओरड पडली आणि कारवाई झाली तरी जोपर्यंत खाकिचे झारीतील शुक्राचार्य आपली पैशांची भूक भागविण्यासाठी गैरधंद्याना मदत करतात तोपर्यंत गैरधंदे बंद होणार आणि समाज सुधारणार नाही.
आरवली मंदिराच्या नजिक रात्री ११.०० वाजता खाकीच्या आशीर्वादावर जुगाराची मैफिल होत असून बंद असणाऱ्या विशाल हृदयाचा पेडण्याहून आलेला ड्राइवर ही मैफिल आयोजित करत आहे. विशाल हृदयाच्या या ड्राइवर खाकीला हाताशी धरून बैठक ठरवीत असतो. विशाल हृदयाच्या ड्राइवर सोबत बारीक शिवडी भाऊ, दूधवाला बंतु, लाकडावर रंधा मारणारा इसलो, पालयेचा अमल्या, गावड्यांचा घंटी, परबांनी दत्ताला ठेवलेला नैवेद्य….म्हणजे प्रसाद, कृष्णाचे नाव धारण केलेला सुतार असे तक्षीमदार आहेत.
जिल्ह्यात जोरदार सुरू असणाऱ्या जुगारामध्ये खाकी वर्दी आपले हात चोळून घेत आहेत, तक्षिमदार मालामाल होत आहेत, आणि पैशांच्या आशेने घरातील दागिणे सुद्धा विकून जुगार खेळणारे सर्वसामान्य, गोरगरीब मात्र भिकेला लागत आहेत. जिल्ह्यात सुरू असणाऱ्या गैरधंद्यांकडे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कधी लक्ष देणार? असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.