सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल; ओळख पटविण्याचे कार्य सुरू…
सावंतवाडी
रेल्वेच्या धडकेत एका अज्ञात महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात घडली. अपघातग्रस्त संबंधित महिलेचा मृतदेह छिन्ह-विछिन्ह अवस्थेत आढळून आला आहे. दरम्यान याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली असून “त्या” महिलेची ओळख पटविण्याचे कार्य पोलिसांकडून सुरू आहे.