जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची चिरंजीवी लता मंगेशकर यांच्यावर लिहिलेली काव्यरचना
ल ता .. ताल सुरांचा मेळ म्हणजे लता
….ता ..लेवार ती गाण्यातील हो साक्षात असे धाता….
मं… गेशाची आहे लाडकी भारत भू चा सूर
गे … यता नि मधुरता तिचा राहिला नूर ….
श… तकानुशतके ती आहे,आहे स्वर सम्राज्ञी
क…मल दलाची कळी ती सुंदर जणू उपजली यज्ञी …
र..दबदली ..छे.. एकमेव ती सत्य शीव सुंदर
विश्व माऊली विश्वातील ती एकमेव मंदिर …
हृदय विराजित कणाकणातून सुरमयी जाहली
दुनिये ने हो अजुन तरी हो दुजी नाही पाहिली …
अखंड घुमतो नाद तिचा हो विश्व व्यापुनी उरतो
अमृतघट तो चराचराला चिरंजीव की करतो …
ती आहे ती आहे ती आहे , राहील पहा व्यापून
ती म्हणजे अवघ्या विश्वाची शाश्वत आहे खुण ..
निर्गुण आहे निराकार ती आहे फक्त सूर
आपल्याच ती विरघळलेली नाही पहा दूर ….
प्रा.सौ.सुमती पवार
(९७६३६०५६४२)
दि : ६ फेब्रुवारी २०२२
वेळ : रात्री १२: ०८