You are currently viewing नियती

नियती

ज्येष्ठ लेखिका कवयित्री श्रीम.माया दिलीपराव यावलकर यांची अप्रतिम काव्यरचना

*_लग्न होऊन मी जेव्हा,_*
*_आमच्या घरात आले._*
*_सर्वांना सामावून घ्यावे,_*
*_सांगणे दिलीपरावांचे झाले._*

*_आपण दिलेला शब्द मी,_*
*_माझ्या मनोमनी रुजविला._*
*_आपणाला दिलेल्या वचनाला,_*
*_खऱ्याअर्थाने सार्थक ठरविला._*

*_इच्छेखातर माझ्या आपण,_*
*_माझे शिक्षण पूर्ण केले._*
*_त्याचे केवढे मोल आहे,_*
*_ते आत्ता समजून आले._*

*_असावे माझे स्वतंत्र अस्तित्व,_*
*_हिच होती आपली मनीषा._*
*_कळले त्यामागचे रहस्य,_*
*_पूर्ण झाली आपली आशा._*

*_शेतकरी संघटनेची स्थापना,_*
*_वरुड गावामध्ये केली._*
*_बळीराजांच्या मनामनांत,_*
*_हक्काची भावना निर्माण झाली._*

*_म्हणणे आपले नेहमीचे,_*
*_हार्टअटॅक सारखे मरण नाही._*
*_सांगणे माझे नेहमीचे,_*
*_आपल्या हातात काहीच नाही._*

*_हार्टअटॅकचे निमित्त घेऊन,_*
*_खरोखर नियतीने साधला डाव._*
*_दोन मिनिटातच संपले सगळे,_*
*_कशालाच मिळाला नाही वाव._*

*_जेव्हाजेव्हा डोळ्यात माझ्या,_*
*_आसवांची होते दाटी._*
*_तेव्हा जुन्या क्षणांना स्मरत,_*
*_मनाला समजावते खोटी._*

*_आठवणी आहेतच माझ्यासोबत,_*
*_सोबतीला तो किर्तीचा सुवास._*
*_सतत आठवणीत राहातो,_*
*_आपला तो प्रेमळ सहवास._*

_*आठवतात ते “क्षण ” ज्यावेळी,*_
*_माझ्या हातावर सोडला प्राण._*
*_खूप करते विचार परंतु,…_*
*_परत मिळत नसते जीवनदान._*
*_परत मिळत नसते जीवनदान._*
😔 😢 😭

©️®️ ✍️
*_माया दिलीपराव यावलकर, वरूड_*

प्रतिक्रिया व्यक्त करा